| पनवेल | प्रतिनिधी |
13 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या चेनची चोरी केल्याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात कारचालक, पूर्वीचा चालक, बॉडीगार्ड व घरकाम करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणाली अहिरे या सेक्टर 10, खारघर येथे राहत असून, त्या आईसह बाली, इंडोनेशिया येथे निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांचे वडील गावी होते. त्यानंतर ते घरी पोहोचले. या वेळी कपाटातील सोन्याची चेन सापडली नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांच्या चालक, पूर्वीचा चालक, बॉडीगार्ड व घरकाम करणारी महिला हे बेडरूममध्ये आल्याचे दिसून आले.







