पनवेलमध्ये सोन्याच्या गंठणाची चोरी

| पनवेल | वार्ताहर |

रिक्षात बसलेल्या 38 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने खेचून चोरटे दुचाकीवरून पळून गेले आहेत. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दर्शना दिलीप पाटील या शिवकर येथे राहत असून त्या रोडपाली येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी वडील बबन फडके, भाऊ सुनील फडके, रीना फडके व मुलगी किमया असे भावाच्या रिक्षाने निघाले. त्या रिक्षाचालकाच्या मागे बसल्या होत्या. रिक्षा स्लो असताना अचानक हेल्मेट घातलेले दोन ईसम मोटरसायकल वरून मागून आले, त्यांनी रिक्षात हात टाकून गळ्यात असलेले गंठण जबरदस्तीने ओढून पसार झाले.

Exit mobile version