| पनवेल | वार्ताहर |
पोलीस असल्याचे सांगून सोन्याची चैन आणि लॉकेट चोरून नेल्याचा प्रकार पळस्पे गावाजवळ घडला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
63 वर्षीय जनार्दन दामोदर मते हे कुडावे, पळस्पे येथे राहात असून, खंडेराया हॉटेलच्या पुढे जेडब्ल्यूसी कंपनीच्या बाजूला, सर्विस रोडवर, पळस्पे गाव येथे आले असता 35 ते 40 वर्षीय इसमाने पोलीस असल्याचे त्यांना सांगितले आणि त्यांच्याकडील सोन्याची चेन आणि लॉकेट हे गळ्यातून काढण्यास सांगितले आणि ते त्यांच्या स्कुटीच्या डिक्कीत ठेवल्याचे भासवून ते स्कुटीच्या डिक्कीत न ठेवता फसवणूक करून घेऊन गेले. 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि लॉकेट पळवून नेल्याप्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.