| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील एका सोन्याच्या दुकानात काम करणार्या महिला कामगाराने सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली आहे. वामन हरी पेठे ज्वेलर्स या दुकानात काम करणार्या एका महिला कामगाराने जवळपास 6 लाख 42 हजार 215 रुपये किमतीच्या दागिन्यांचा अपहार केला व त्याबदल्यात बनावट दागिने बनवून ते ठेवले. याबाबतची माहिती दुकानातील संबंधित अधिकार्यांना मिळताच त्यांनी याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली. त्यानुसार संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.