। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
वाशी बस थांबा येथे बसमध्ये चढत असताना तीन तरुणांनी एका प्रवाशासोबत वाद घालत त्याचा मोबाईल हिसकावला आणि तेथून पळून गेले.
नवी मुंबई येथील हेतराज प्रजापती (22) हे सोमवारी (दि. 12) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रांसह वल्लीपीर रस्त्यावरील वाशी बस थांबा येथे बसमध्ये चढत होते. दरम्यान तीन जणांनी त्यांच्याशी उगाचच वाद घालून त्यांना दमदाटी करू लागले. वाद घालत असताना एका भामट्याने त्यांच्या हातामधील 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावला. हेतराज यांनी मोबाईल मागितला असता तिघांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी हेतराज यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.