रस्त्यावरील लोखंडी पूलाची चोरी

। पोलादपूर । वार्ताहर ।
तालुक्याच्या मुख्य गावाची ग्रामपंचायत असलेल्या पोलादपूरमध्ये नगरपंचायत झाल्यानंतर झालेल्या रस्त्यामुळे वापरात नसलेला लोखंडी पूल सोमवारी काही व्यक्तींनी ग्रामस्थांच्या डोळयांदेखत कापून एका परिचित वाहनातून चोरून नेल्यानंतर बुधवारी पोलादपूर नगरपंचायतीच्या विरोधी गटनेत्यांनी मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याकडे लेखी तक्रारवजा निवेदन देऊन संबंधितांविरूध्द कारवाईची मागणी केली आहे.
पोलादपूर ग्रामपंचायतीने पार्टेकोंड-सावंतकोंड भागातील विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना पायी तसेच दुचाकीवरून शहराशी संपर्कात राहण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत साधारणपणे 10-12 फूट लांबीचा आणि 6 फूट रूंदीचा एक लोखंडी पूल बांधून घेतला होता. यानंतर नगरपंचायत अस्तित्वात आल्यावर या पार्टेकोंड सावंतकोंड भागात रस्ता करण्यात आल्याने या लोखंडी पुलावरील रहदारी बंद झाली. गेल्या काही वर्षांपासून वापराविना असलेल्या या लोखंडी पुलाकडे रस्त्यावरून जाणार्‍या व येणार्‍या स्थानिक लोकांचे लक्ष असे. मंगळवारी हा लोखंडी पूल नटबोल्ट कापून चोरीला गेल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आले.

Exit mobile version