रेल्वे स्टेशन परिसरातून दुचाकीची चोरी

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरातून दुचाकी चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरूवारी (दि.25) रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी श्रीकृष्ण पांडुरंग होतेकर (38, रा. नाचणे रोड, रत्नागिरी) यांनी मोटारसायकल चोरीप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

श्रीकृष्ण यांनी आपली मोटारसायकल (एमएच-08-एएफ-2296) गुरूवारी रोजी रेल्वेस्टेशन पार्किंगमध्ये उभी करून ठेवली होती. रात्रीच्या सुमारास ही मोटारसायकल अज्ञाताने चोरून नेली, अशी तक्रार श्रीकृष्ण यांनी शहर पोलिसांत दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version