…तर गोदी कामगारांचा संप अटळ

मुंबई | प्रतिनिधी |
भारतातील बंदर व गोदी कामगारांच्या मागण्यांबाबत सरकारने गांभीर्याने विचार न केल्यास संप अटळ असल्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. या मागण्यांबाबत दिल्लीमध्ये इंडियन पोर्ट असोसिएशन व्यवस्थापन व फेडरेशनच्या नेत्यांची महत्वपूर्ण मिटिंग घेण्यात आली.मटिंगमध्ये चांगली व परिणामकारक चर्चा झाल्याबद्दल फेडरेशनच्या नेत्यांनी मिटिंगच्या चेअरमनचे आभार मानले. या मिटिंगला फेडरेशनचे कामगार नेते सुधाकर अपराज, विद्याधर राणे, मोहमद हनिफा, पी. के. सामंत राय, टी. नरेंद्र राव आदी कामगार नेते उपस्थित होते.
पुढील मिटिंग 5 जानेवारी 2022 रोजी केंद्रीय श्रम आयुक्तांबरोबर होणार असून, या मिटिंगमध्ये मागण्यांबाबत सन्माननीय तडजोड न झाल्यास 6 जानेवारी 2022 पासून बंदर व गोदी कामगारांचा संप अटळ आहे.

Exit mobile version