जिल्ह्यात 123 रुग्ण, 7 तालुक्यात नवे रुग्ण नाही

5 जणांचा मृत्यू तर 112 कोरोनामुक्त
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात मंगळवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी नव्याने 123 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 112 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मंगळवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 42, पनवेल ग्रामीण 23, उरण 1, खालापूर 2, कर्जत 7, पेण 4, अलिबाग 38, माणगाव 1, महाड 5 असे एकूण 123 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर रोहा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, तळा आणि पोलादपूर या 7 तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. त्याचप्रमाणे तर पनवेल तालुक्यात 4 जर पनवेल मनपा क्षेत्रामध्ये एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 64 हजार 932 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 59 हजार 200 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 189 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 1 हजार 543 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version