शहरातील ‘या’ इमारतींमध्ये राहणं ठरेल जीवघेणं; 84 इमारती आहेत धोकादायक

। उरण । वार्ताहर ।
उरण शहरातील 14 इमारती अति धोकादायक असून 70 इमारतींची दुरवस्था झाली आहे. एकंदरित 84 इमारतींची पडझड झाल्याने या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला उरण नगर परिषदेच्यावतीने देण्यात येत असून नोटीसांच्या माध्यमातूनही सुचित केले आहे. तरीदेखील शहरातील जीर्ण झालेल्या काही इमारतींमधील रहिवासी आपल्या कुटुंबासह तिथेच राहत आहेत.

उरण नगर परिषदेकडून शहरातील धोकादायक इमारतींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता शहरातील एकूण 84 इमारती धोकादायक आहेत असून त्यातील 14 इमारती या अति धोकादायक असून 70 इमारतीची दुरावस्था झाली आहे. यासंदर्भात सदर इमारतींना नोटीसा बजावण्यात आल्या असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न शासकीय अधिकारी वर्गासमोर उभा राहिला असून उरण शहरातील रहिवाशांच्या जीवाची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी मनसेच्या उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत यांनी केली आहे.

Exit mobile version