पेणमध्ये संवेदनशील मतदार केंद्र नाही

| पेण | प्रतिनिधी |

एक काळ असा होता की, पेणमध्ये दादर, रावे, खरोशी, गडब, शिहू, या गावांकडे वक्र नजरेने पाहिले जायचे. परंतु, नविन पिढीच्या तरूणांनी राजकारणातले छक्केपंज्जे ओळखून विचार सरणीत बदल केल्याने गेली कित्येक वर्ष पेण तालुक्यातील मतदान हे शांतता व सुव्यवस्थेला बांधा न पोहोचवता अतिशय शांततेत होत आहे.

पेण तालुक्यामध्ये एकूण 190 मतदार केंद्र असून या मतदान केंद्रामध्ये एकही मतदार केंद्र संवेदनशील नाही, अशी माहिती प्रांताधिकारी प्रविण पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. पुढे त्यांनी माहिती देताना सांगितले की, पेणमध्ये एकूण 5 जिल्हा परिषद गट असून 10 पंचायत समितीचे गण आहेत. त्यात जिल्हा परिषदेमध्ये जिते, दादर, वडखळ, महलमिरा डोंगर, शिहू असे गट असून पंचायत समितीमध्ये जिते, वाक्रुळ, रावे, दादर, वाशी, वडखळ, महलमिरा डोंगर, वडगाव, डोलवी, शिहू असे गण आहेत. यामध्ये एकूण 1 लाख 39 हजार 479 मतदार असून यामध्ये पुरूष 69 हजार 581 तर स्त्रीया 69 हजार 898 इतके आहेत. तसेच, यावेळी पुर्ण तालुक्यात आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे अवाहन देखील करण्यात आले. या पत्रकार परिषदेसाठी प्रांताधिकारी प्रविण पवार, तहसिलदार तानाजी शेजाळ, नायब तहसिलदार प्रसाद कालेकर, नितिन परदेशी, तुषार कामत, पेण पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी शर्मिला शेंडे या उपस्थित होत्या.

Exit mobile version