सुक्या मासळीला मोठी मागणी

| उरण | वार्ताहर |

उरण परिसरातील कोळी बांधव करंजा, मोरा या बंदरांतून करंदी, जवळा, ओल्या वाखट्या, बोंबिल अशी विविध प्रकारची मासळी रस्त्याच्या कडेला उन्हात सुकवून तिचे सुक्या मासळीत रूपांतर करतात. उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळ्यात या सुक्या मासळीला अधिक मागणी असल्याने रोजगार मिळत आहे. त्यामुळे सुक्या मासळीच्या विक्रीतून कित्येक कुटुंबांना आधार मिळत आहे. उरणच्या या सुक्या मासळीला मुंबई, नवी मुंबई परिसरातून देखील मोठी मागणी मिळत आहे. वाराला अनेक घरांमध्ये ताज्या मासळी सोबतच सुकी मासळी देखील आवडीने खाल्ली जाते. त्यामुळे उरण परिसरातील ताज्या सुक्या मासळीला मोठी मागणी मिळत आहे. यामध्ये वाखट्या, सुके बोंबील, कोलंबीचे सोडे, बारकी जवळा सुकट, करंदी सुकवून बनवली जाणारी आंबडी सुकट, बारीक मासे सुकवून बनवली जाणारी टेंडली सुकट, मांदेली, ढोमी, शिंगाळा, खारे बांगडे, सुरमई, घोळीचा काटा, सुकी माकुल असे प्रकार असून पावसाळा संपल्यानंतर मासळी विक्रेते मोठ्या प्रमाणावर मासळी खारवून ती सुकवण्यात मग्न होत असल्याचे दिसते.

Exit mobile version