दत्तमंदिरातील चोरीचा तपास नाहीच

दत्तभक्त, ग्रामस्थ संप्तत; महाआरतीचा निर्धार
| रेवदंडा | वार्ताहर |
चौल भोवाळे पर्वतवासी श्री दत्त मंदिरातील चांदीची प्रभावळ चोरीप्रकरणी अद्याप कोणताही तपास न लागल्याने दत्तभक्त व ग्रामस्थांनी संप्तत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबाबत गुरूवार, दि. 16 मार्च रोजी राजिपचे माजी विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा पोलीस ठाण्याच्या प्रांगणातील दत्त मंदिरात महाआरतीचा निर्धार व पोलिसांना निवेदन देण्यात येणार असल्याचे पत्र रेवदंडा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, दत्त मंदिरातील सुमारे चाळीस किलो चांदीच्या प्रभावळीची चोरी दि. 15 डिसेंबर रोजी मध्यरात्री झाली. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेजसुध्दा उपलब्ध आहेत. परंतु, अद्यापपर्यंत चोरीचा तपास पोलिसांकडून लागलेला नाही. या चोरीबाबत तपास कुठपर्यंत आलेला आहे, याची काही वेळा चौकशी पोलीस ठाण्यात केली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्याशी संपर्क साधला असता, तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

Exit mobile version