वाचनाला पर्याय नाही

अ‍ॅड. सुनीता जोशी यांचे प्रतिपादन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

ग्रंथ हे गुरु, मित्र, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका बजावत असतात. काय वाचावे, किती वाचावे यामुळे वाचक भरकटत असतो, त्यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे. स्वतःला अद्यावत ठेवणे, स्पर्धेत टिकून रहाणे यासाठी वाचनाला पर्याय नाही, असे प्रतिपादन अ‍ॅड. सुनिता जोशी यांनी मंगळवारी (दि. 27) रोजी अलिबागमध्ये केले.

ग्रंथोत्सवाच्या शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग, डॉ. हेमंत पवार, सार्वजनिक वाचनालय, अलिबाग, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या उपाध्यक्षा शैला पाटील, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोदार्डे, श्री. वणगे, रायगड जिल्हा ग्रंथालय सदस्य नागेश कुलकर्णी, रमेश धनावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावित व आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी केले.
ग्रंथोत्सवाची सुरुवात ग्रंथ दिंडीमार्फत करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी सहभाग घेऊन हा आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय, डोंगरे हॉल, येथे ग्रंथोत्सवाचा उद्घाटन मंगळवारी (दि.28) अडॅ. सुनीता जोशी याच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मागदर्शन करताना सुनीता जोशी म्हणाल्या की, ग्रंथ समाजाला दिशा देण्याचे व समाजाला सुधारण्याचे काम करतात. वाचनामुळे विचारात प्रगल्भता येते. नवे विचार मांडून समाजाला दिशा देणे हे ग्रंथाचे काम आहे. मोठ्यांची चरित्र आपल्याला प्रेरणा देतात. ग्रंथ स्वीकारणे किंवा नाकारणे हे सर्वस्वी वाचकावर अवलंबून आहे. गावातली माणसे कोणते ग्रंथ वाचतात, तेथील ग्रंथालये किती समृद्ध आहेत यावरून गावाची समृद्धी मोजली जाते. वाचनातून व्यापक जीवनदर्शन होत राहते. सर्वकष वाचन हे आत्मशोध घेण्यास प्रवृत्त करते. आपल्या ज्ञानाचा आवाका विस्तारते, तर संत साहित्य निरामय आनंदाचा मार्ग दाखवते असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version