सुधाकर घारे यांना जामीन?

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| नेरळ | प्रतिनिधी |

खोपोली येथील शिवसैनिकाच्या मृत्यूप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात नाव असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मिळविला आहे काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. 23 जानेवारी रोजी सायंकाळी कर्जत परिवर्तन आघाडीच्या बैठकीला हजेरी लावल्यानंतर आज 24 जानेवारी रोजी घारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात उपस्थित होते.

26 डिसेंबर रोजी खोपोली येथील शिवसेना कार्यकर्त्यांचा खून झाला होता. त्यानंतर खोपोली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांचे नाव घेण्यात आले होते. त्या दिवसापासून सुधाकर घारे हे नॉट रिचेबल आणि कुठेही दिसून येत नव्हते. शेवटी घारे यांनी आधी पनवेल जिल्हा सत्र न्यायालयात आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केले. पनवेल येथील जिल्हा सत्र न्यायालयाने ती जामीन फेटाळला होता, मात्र 23 जानेवारी म्हणजे तब्बल महिन्याने सुधाकर घारे हे खुलेआम कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिसून आले. मार्केवाडी येथील कडाव जिल्हा परिषद गटाच्या आढावा बैठकीत उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शनदेखील केले. त्यावेळी घारे हे आपल्या महागड्या गाडीमधून नाही तर लहानशा वॅगनार गाडीमधून आले होते. बैठक संपवून ते त्याच गाडीने पुढे निघून गेले होते. आज 24 जानेवारी रोजी सुधाकर घारे हे कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात उपस्थित होते. तेथे कर्जत परिवर्तन आघाडीच्या उमेदवार यांच्याशी चर्चा करीत होते. अगदी त्याचवेळी रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यादेखील कर्जत शहरात उपस्थित होत्या. मात्र, त्यावेळीदेखील पोलिसांनी खोपोली गुन्ह्याप्रकरणी सुधाकर घारे यांना अटक केली नाही. याचा अर्थ, घारे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला असावा, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version