ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन; आरोपी अटकेत

| मुंबई | वृत्तसंस्था ।

मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तरुणाने असे कृत्य का केले याचा पोलीस तपास करत आहे.

धरमपाल सिंह (36) असे तरूणाते नाव आहे. तो नवी दिल्ली येथील लक्ष्मीनगर भागातील रहिवासी आहे. मुंबईत घातपाताची धमकी देण्याचे सत्र सातत्याने सुरू आहे. 14 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास एका व्यक्तीने मुंबई फायर ब्रिगेड कंट्रोलला फोन करून ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन केला. ताज हॉटेलमध्ये बॉम्बचा स्फोट करणार असून तुम्हाला हवे ते करा, असे देखील तो यावेळी म्हणााला. यानंतर अग्निशमन दलाने मुंबई पोलिसांना तात्काळ याची माहिती दिली. तात्काळ पोलीस आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथक ताज हॉटेल परिसरात दाखल झाले. पोलिसांनी ताज हॉटेलची तपासणी केली मात्र तासाभरानंतरही काहीही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर बीकेसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून तरूणावर गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version