तीन ठार, अनेक जखमी
। उत्तराखंड । वृत्तसंस्था ।
केदारनाथ मंदिराकडे जात असताना मार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे. चिरबासाजवळ दरड कोसळली आहे. त्यामुळे तीन यात्रेकरुंचा मृ्त्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आठजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन यात्रेकरू महाराष्ट्रातील आहेत. जखमींना उपचारासाठी गौरीकुंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. बचाव पथक देखील दाखल झाले होते. अद्याप बचावकार्य सुरु आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील किशोर अरुण पराटे (31) नागपूर महाराष्ट्र, सुनील महादेव काळे (24) जालना महाराष्ट्र, अनुराग बिष्ट, तिलवाडा रुद्रप्रयाग यांचा समावेश आहे.
गौरीकुंड ते केदारनाथ असा 16 किलोमीटर अंतराचा पायी मार्ग आहे. यादरम्यान अनेकदा भूस्खलनाच्या घटना घडत असतात. चीरबासा हा भूस्खलन होण्यासाठीच ओळखला जातो. पावसामध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत असते. मलबा, मोठे दगडं पडल्याने अपघात होत असतात. मागच्या वर्षी अशाच अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच हा मार्ग जोखमीचा म्हटला जातो. केदारनाथ यात्रा मार्गावर असलेल्या गौरीकुंड इथे आज सकाळी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. काही वेळेतच उत्तराखंड राज्याची आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी घटनास्थळी पोहचली असून जखमींना मदत आणि दरड हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली होती.