शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उसळली गर्दी

संध्याकाळी उशिरापर्यंत तहसील कार्यालय सुरूच
| राबगाव /पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील हातोंड, अडुळसे, खवली, घोटावडे, तिवरे, आपटवणे, शिळोशी, शिद्धेश्‍वर बु., चिवे, ताडगाव, खांडपोली, आतोणे, चांदरगाव, माणगाव बू. या 14 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 28 नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. मात्र, सुरुवातीचे दोन-तीन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍यांची संख्या फारच कमी होती. मात्र, दोन दिवसांपासून गर्दी वाढली होती. शुक्रवारी (दि. 2) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने पाली तहसील कार्यालयात सकाळपासूच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली होती. संध्याकाळी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास विलंब झाल्याने सर्व इच्छुकांनी शुक्रवारी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ उडाली होती. इच्छुक आणि त्यांचे समर्थक तहसील कार्यालयाच्या परिसरात अर्जासोबत लागणार्‍या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेकांनी अर्ज दाखल झाल्यानंतर सुटकेचा नि:श्‍वास सोडला. शुक्रवारी (दि.2) शेवटच्या दिवशी तालुक्यात 14 सरपंचपदासाठी 48 अर्ज, तर 110 सदस्यपदासाठी 276 उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. खवली ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या एका जागेसाठी सर्वांधिक अर्ज म्हणजे 8 अर्ज, सदस्यपदासाठी सिद्धेश्‍वर बु. ग्रामपंचायतीमध्ये 9 जागासाठी सर्वांधिक म्हणजे 29 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

Exit mobile version