रेवदंडा क्रिकेट स्पर्धेत थेरोंडा विजयी

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा मोठा कोळीवाडा आयोजीत कै. सुभाष धर्मा बोबडी व कै. हेमंत हरिभाऊ बोबडी स्मृती चषक टेनिसबॉल मर्यादित  षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत विजय मार्तंड थेरोंडा संघ प्रथम विजयाचा मानकरी ठरला तर व्दितीय क्रमांकाचे जय बजरंग तळेखार, तृतीय क्रमांक अंश इलेव्हन चौल यांनी पटकाविले. या स्पर्धेत उत्कृष्ट गोलदांज जय बजरंग तळेखार संघाचा अजय वाघीलकर, स्पर्धेत उत्कृष्ट जय बजरंग तळेखार संघाचा फलदांज विजय घाणेकर, मालिकावरी जय बजरंग तळेखार संघाचा विजय घाणेकर यांची निवड करण्यात आली.

या स्पर्धेचा प्रारंभ रेवदंडयातील व्यापारी चंद्रकांत दांडेकर व शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख योगेश पिटनाईक, महेश पाटील, शेखर वरसोलकर, परशुराम बोबडी, सचिन पाटील व मोठा कोळीवाडा ग्रामस्थ व युवावर्ग यांचे उपस्थितीत संपन्न झाला. स्पर्धेत प्रथम क्रमांकास रूपये 30 हजार रोख रक्कम व भव्य स्मृती चषक, व्दितीय क्रमांकास रूपये 20 हजार व भव्य स्मृती चषक, तृतीय क्रमांकास रूपये 10 हजार व भव्य स्मृती चषक तसेच उत्कृष्ट गोलदांज, उत्कृष्ट फलदांज व मालिकावीर यांना चषक ठेवण्यात आले होते.

स्पर्धेत ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शेकापक्षाचे राजन वाडकर, सामाजीक कार्यकर्ते शरद गोंधळी, रेवदंडा ग्रा.प. उपसरपंच मंदाताई बळी, अजीत पाटील आदीने स्पर्धे दरम्यान भेटी दिल्या. स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ शिवसेना शिंदे गट अलिबाग तालुका अध्यक्ष प्रफुल्लशेठ मोरे, योगेश पिटनाईक, समिर आठवले व मोठा कोळीवाडा ग्रामस्थ आदीचे उपस्थितीत संपन्न झाला. स्पर्धेत पंचाचे काम पुरूषोत्तम भगत व संतोष सुडकू यांनी पाहिले तर सुत्रसंचलन व समालोचन सौरभ भुरे व पंकज बनिया यांनी केले,गुणलेखन बाळकृष्ण धरणे यांनी पाहिले. तर  रेवदंडा मोठा कोळीवाडयातील विशाल गुंडा, निरंज बनिया, करण बंगलेकर, साहील बनिया, अथर्व रागा, अविष्कार बंगळेकर, आर्यन मानाजी, जय टिवळेकर,हर्ष टिवळेकर, प्रतिक बनिया, सुशांत बनिया, निर्माण बंगळेकर, प्रणव बोबडी आदीने विशेष परिश्रम घेतले.  

Exit mobile version