। रेवदंडा । वार्ताहर ।
रेवदंडा हरेश्वर मैदानात भिवंडी, पालघर, पनवेल मधील ऑयकॉन खेळाडूच्या सहभागानी रंगलेली स्वर्गीय जनार्दन हाले स्मृती चषक मर्यादीत षटकांच्या टेनिस बॉल स्पर्धेत हॅपी शॉप रेवदंडाने पुरस्कृत केलेला महाड संघ विजेता ठरला.
प्रथम विजेता हॅपी शॉप रेवदंडा पुरस्कृत महाड संघाला स्वर्गीय जनार्दन हाले स्मृती भव्य चषक व 1,11,111 रूपयांचे रोख पारितोषिकांने गौरविण्यात आले. या स्पर्धेत व्दितीय क्रमांक भोसले वॉरियर्स पुरस्कृत तळेखार ब संघाला स्वर्गीय जनार्दन हाले स्मृती भव्य चषक 55,555 रूपये तर तृतीय क्रमांक माऊ एकविरा थळ या संघाला संघाला स्वर्गीय जनार्दन हाले स्मृती भव्य चषक व 33,333 रूपये रोख पारितोषिकांनी गौरविण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट गोलदांज महाड संघाचा जयेश खेरकर-कुलर व चषक, उत्कृष्ट फलदांज माऊ एकविरा थळ संघाचा नागेश शिंद-सायकल व चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तळेखार ब संघाचा तेजस काटकर-चषक, स्पर्धेत षटकार किंग व मालिकावीर ओमकार महाडीक-सायकल, कुलर व चषक, तसेच अंतिम सामना मॅन ऑफ द मॅच जयेश खेरकर-कुलर व चषक यांची निवड करण्यात आली.
या स्पर्धेचा शुभारंभ स्वर्गीय जनार्दन हाले यांच्या पत्नी आशा हाले यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी विजय चौलकर, अशोक नाईक आदी थेरोंडा गणेश पाडा येथील मान्यवर तसेच श्री गणेश थेरोंडा संघ व थेरोंडा श्री गणेश पाडा ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. स्पर्धेत पंचाचे काम प्रविण आंद्रे, राजू पाटील व पुरूषोत्तम भगत यांनी पाहिले तर इम्रान बुखारी व विकास साखरकर यांनी समालोचनाचे काम पाहिले. स्पर्धेत गाव टू गाव सोळा संघ व आयपीएल फारमॅट चार फिल्डर आयकॉन असे आठ संघ अशा एकूण 24 संघानी सहभाग घेतला, आयपीएल फारमॅटमध्ये भावेश पवार, केतन म्हात्रे, पवन केणी, अक्षय पवार, ओमकार हारपाल, आदी प्रसिध्दी आयकॉन फिल्डरचा खेळ पहावयास मिळाला.