। मुंबई । प्रतिनिधी ।
‘ओमिक्रॉन’ या नवीन विषाणूच्या प्रकाराने जगामध्ये दहशत माजवली आहे. भारतात गुरुवारी ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आणि या विषाणूने अखेर देशात शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले. या विषाणूबाबत फारशी माहिती नसल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
हेल्थलाईन या वेबसाईटने दिलेल्या माहितीनूसार, ओमिक्रॉन या विषाणूच्या प्रकारात कोरोना प्रमाणेच लक्षणे दिसतात. तज्ज्ञांच्या मते ताप, खोकला आणि श्वास लागणे तसेच स्नायु दुखणे ही या रोगाची लक्षणे आहेत. दक्षिण आफ्रिकेत लागण झालेल्या रुग्णांच्या तपासणीवरुन रुग्णांची चव किंवा वास कमी झाल्याची तक्रार नाही. त्यामुळे या विषाणूची लागण झाल्यास चव किंवा वास जाणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
डब्ल्यूएचओच्या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार.या प्रकारामुळे प्रभावित दक्षिण आफ्रिकेतील भागात सकारात्मक चाचणी करणार्यांची संख्या वाढली आहे, परंतु हे ओमिक्रॉन किंवा इतर घटकांमुळे आहे की नाही, हे समजून घेण्यासाठी महामारीविषयक अभ्यास सुरू आहे.