चोरट्यांना गुजरातमधून घेतले ताब्यात

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल शहरातील हॉलमार्क मोटर लिंकस्‌‍‍ येथून 1 लाख 81 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून पळून गेलेल्या दुकलीपैकी एकाला पनवेल शहर पोलिसांनी गुजरातमधून ताब्यात घेतले आहे.

पनवेल शहरातील पनवेल इंडस्ट्रीयल को.ऑ. इस्टेट लिमीटेडमधील हॉलमार्क मोटर लिंकस्‌‍‍ एल.एल.पी., (रॉयल इनफील्ड) येथून लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, दोन मोबाईल फोन व 1 लाख 70 हजार रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांकडे गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक हजरत पठाण, पोहवा कुडावकर, पोना प्रविण मेथे व पोशि शशीकांत काकडे आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला असता आरोपी मुरली उर्फ अलेक्स पवार (रा. वलसाड, गुजरात) याला गुजरात येथून ताब्यात घेतले असता त्याने त्याचा साथीदार दिनेश माहिते (रा. वलसाड, गुजरात) याच्या साथीने चोरी केल्याची माहिती दिली. त्याच्याकडून पोलिसांनी 50 हजार रुपये जप्त केले असून, त्याचा दुसरा साथीदार दिनेश माहिते याचा शोध पोलीस घेत आहेत.

Exit mobile version