सोन्याच्या बांगडीची कापून चोरी
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल बसस्थानकात चोरांचा सुळसुळाट झाला असून, या चोरांनी बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाच्या हातातून सोन्याची बांगडी कापून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेण तालुक्यातील आदर्शनगर येथील रहिवासी असलेल्या अनिता राजेंद्र देसाई (61) या पनवेल बसस्थानकावरून पेण-अलिबागकडे जाणाऱ्या बस (एमएच-20-बीसी-3195) मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने कोणत्यातरी साधनाने त्यांचे हातातील 57 हजार पाचशे रूपये किमतीची व अडीच तोळे वजनाची सोन्याची बांगडी कापून चोरी करून नेली. याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.