। पनवेल । वार्ताहर ।
मोटरसायकलवरून आलेल्या अनोळखी इसमाने तरुणाच्या हातातील मोबाईल खेचून ते पसार झाले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडघर- करंजाडे येथे राहणारे राजेश कुमावत हे 4 जुलै रोजी तबेल्यात दूध आणण्यासाठी निघाले. सेक्टर नंबर दोन ए येथील जिल्हा परिषद शाळा चिंचपाडा समोर आले असता त्यांच्या डाव्या हातात मोबाईल होता. यावेळी पाठीमागून एका मोटरसायकलवर दोघेजण आले व पाठीमागे बसलेले इसमाने राजेश यांच्या हातातील मोबाईल हिसकावला व ते मोटरसायकल वरून पळून गेले.