। पनवेल । वार्ताहर ।
महिलेच्या गळ्यातील आठ तोळे वजनाचा सोन्याचा हार आणि सोनसाखळी खेचून दोघेजण दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंदा गावंड (45) या करंजाडे, सेक्टर आर 5 येथे राहत असून, त्या लक्ष्मीनारायण मंदिरात लग्नाला जात होत्या. रात्री पावणेदहाच्या सुमारास वाघिवली वाडी येथून चालत जात होत्या. त्याचवेळी दुचाकीवरून दोघे आले आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातील आठ तोळ्यांचा हार आणि सोनसाखळी जबरदस्तीने खेचली. या झटापटीत कुंदा जमिनीवर पडल्या.







