नेरळमध्ये मोबाईल शॉप फोडले; साडेनऊ लाखांची चोरी

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ जुनी बाजारपेठेतील सॅमसंग मोबाईल वर्ल्ड या मोबाईल शॉपचचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी साडे नऊ लाखाचा मुद्देमाल लांबविला आहे. सदर चोरटा हा चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

सरकारी रेशन दुकानासमोर सॅमसंग मोबाईल वर्ल्ड या मोबाईल विक्रीचे दुकान आहे. एक चोरटा त्या मोबाईल दुकानाचे शटर फोडून आत शिरला आणि दुकानातील विविध कंपन्यांचे जुने आणि नविन मोबाईल हे आपल्या सोबत नेले. त्याचवेळी काही वस्तू देखील नेल्या आहेत. सकाळी दुकानाचे मालक हे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना आपल्या दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी त्याबाबत नेरळ पोलीस ठाणे यांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरी झालेल्या वस्तूंचा पंचनामा केला. चोराने दुकानातील 80 हजार रूपये रोकड आणि दुकानात विक्रीसाठी आणि दुरुस्तीसाठी आलेले ओपो, सॅमसंग, एप्पल अशा माहगडया विविध कंपनीचे मोबाईल, असा एकूण सव्वा नऊ लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अलिबाग येथून श्‍वान पथकाला आणून या भागाची पाहणी केली आहे.

Exit mobile version