| पाली | वार्ताहर |
यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत सन 2020-2021 या वर्षाकरीता पाच जिल्ह्यांमध्ये कोकण विभागात उत्कृष्ट पंचायत समितीचा तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सुधागड पाली पंचायत समिती यांना मिळाले असून सदर पारितोषिक सोमवारी (दि.9) कोकण भवन येथे विभागिय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, गिरीश भालेराव उपायुक्त विकास यांच्या हस्ते रमेश सुतार, उज्वला देसाई, गजानन लेंडी, लता मोहिते, मयुर कारखानीस यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत होते.







