‘या’ क्रिकेटपटूलाही पडली अलिबागची भूरळ; आक्षीमध्ये खरेदी केली जमिन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबागचे आकर्षण क्रिकेट जगतापासून ते फिल्म इंडस्ट्रीत कायम आहे. अनेकांना अलिबागची कायम भुरळ पडली आहे. यात अजून एका क्रिकेटपटूची भर पडली आहे. रणजी पटू, आयपीएल तसेच गोवा क्रिकेटकडून प्रतिनिधित्व करणारा तसेच, समालोचक असणारा सिद्धेश लाड याने अलिबाग तालुक्यातील आक्षी येथे दहा गुंठे जागा खरेदी केली आहे. अलिबाग दुय्यम निबंधक कार्यालयात सिद्धेश याने बुधवारी आपल्या मालमत्तेची नोंदणी केली आहे. ॲड महेश म्हात्रे यांनी सिद्धेश याच्या मालमत्तेबाबत व्यवहार केला आहे.

 

अलिबाग तालुका हा निसर्गाने नटलेला आहे. त्यामुळे अनेकांना अलिबागच्या सौंदर्याची भुरळ पडलेली असते. उद्योजक, राजकारणी, अभिनेते यासह आघाडीचे क्रिकेटर हे अलिबागकर झाले आहेत. सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, रोहित शर्मा, विराट कोहली, रवी शास्त्री, दिनेश कार्तिक या क्रिकेटर यांनी अलिबाग मध्ये मालमत्ता घेतलेली आहे. त्यामुळे अलिबागमध्ये आघाडीचे क्रिकेटर हे अलिबागकर बनले आहेत. तर अनेक क्रिकेटर भविष्यात अलिबागकर होण्याच्या मार्गावर आहेत. 

रणजी, आयपीएल खेळणारा आघाडीचा क्रिकेटर सिद्धेश हा सुध्दा आता अलिबागकर झाला आहे. मुंबई इंडियन्स, कोलकत्तामधून सिद्धेश हा आयपीएल खेळला आहे. फलंदाज आणि बॉलिंग असे दोन्हीमध्ये सिद्धेश हा उत्तम खेळाडू आहे. मुंबई संघाचा रणजीचा कप्तान ही सिद्धेश राहिलेला आहे. सध्या तो गोवा क्रिकेट तर्फे खेळत आहे. अलिबाग तालुक्यातील नारळी पोफळीच्या बागा असलेल्या आक्षी गावात सिद्धेश याने दहा गुंठ्याची बागायती मालमत्ता खरेदी केली आहे. यामध्ये छोटे घरही आहे. अलिबाग दुय्यम निबंधक कार्यालयात येऊन सिद्धेश याने नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. लवकरच तो येथे आपले घर बांधून आराम करण्यासाठी येणार आहे.

Exit mobile version