…हे कुटुंब आजही मदतीपासून वंचित

पूरग्रस्त कुटुंब मदतीपासून वंचित
। खेड । प्रतिनिधी ।
रत्नागिरी-खेड तालुक्यातील बर्गेे कुटुंब अतिवृष्टीमुळे संपूर्णतः उद्धवस्त झाले असून संबधित परिसर पूर्ववत होत असताना, आजही ते मदतीपासून वंचित आहे.
अतिवृष्टीमुळ खेड तालुक्यातील अनेक गावात दरड कोसळुन अनेक घरे उध्वस्त झाली होत तुटपूंज्या प्रमाणात का असेनात, पण विविध स्वरूपातील मदत आपत्तीग्रस्तांना मिळत आहे. असे असले तरी आजही अनेक आपत्तीग्रस्त शासन, प्रशासन तथा समाज यांच्यापासून दुर्लक्षित राहिले आहेत. त्यापैकी एक कुटुंब म्हणजेच, खेड तालुक्यातील चोरवणे धनगरवाडीमधील बबन जाणू बर्गे. यांचे कुटुंब.
या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात अनेक गावात दरड कोसळुन अनेक घरे उध्वस्त झाली होती. बबन बर्गे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळुन त्यांचे घर पडले आहे. सोबतच त्यांचा संसार आणि म्हशीचा गोठा, मेहनतीने लागवड केलेली भातशेती असे सारे काही वाहून गेले आहे. ते आणि त्यांचे कुटुंब बेघर झाले असून त्यांची राहण्याची सोय होत नसल्याने शासनाच्या माध्यमातून तात्पुरती निवारा शेड उपलब्ध करून दयावी तसेच या परिस्थितीची दखल घेत शासनाने त्यांना घर बांधून दयावे अशी मागणी ग्रामविकास मंडळ, चोरवणे आणि ग्रामस्थ यांनी केली आहे.

Exit mobile version