ये तो सिर्फ ट्रेलर हे, पिक्चर अभी बाकी हे…

चित्रलेखा पाटील यांचा विरोधक व प्रशासनाला इशारा
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
2018-19 मध्ये शेकाप आम.जयंत पाटील यांनी मंत्रालयाच्या पायर्‍या घासून या रस्त्यासाठी निधी आणला. पण 2019 मध्ये विरोधकांनी त्याच उलटे भांडवल केलं. त्यांनी रस्ता व निधी अडवण्याचे काम केले, असा आरोप शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केला. त्या शेकाप आयोजित खानाव येथे बुधवारी (दि.13) रास्ता रोको आंदोलनामध्ये बोलत होत्या. ये तो सिर्फ ट्रेलर हे, पिक्चर अभी बाकी हे…असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अलिबाग रामराज रस्त्याची सद्यस्थिती अत्यंत भयावह असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्डे, दगडगोटे, चिखल यामुळे या जीवघेण्या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या रस्ता करण्यासाठी फाईल फिरवायला लागते व प्रशासनापर्यंत आवाज पोहचवायला लागतो. आम्हाला जनतेला त्रास द्यायचा नाही आहे पण प्रशासनापर्यंत आवाज पोहचवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायलाच लागेल. जेव्हा जेव्हा शेकाप रस्त्यावर येतो तेव्हा तेव्हा त्याचा परिणाम दिसतो. हा लाल बावटा जेव्हा दिमाखाने उभा राहतो तेव्हा परिणाम येतो.

ये तो सिर्फ ट्रेलर हे, पिक्चर अभी बाकी हे… अशी घोषणा देत त्यांनी आश्‍वासन दिले की जेवढ्या वेळा रस्त्यावर उतरायला लागेल तेवढ्या वेळा येऊ पण हा रस्ता शेकापच करेल. शेकापक्ष जे बोलतो ते करुन दाखवतो. कोरोना काळात सगळ्यांनी पाहायल आहे शेकापनी अन्नधान्याचे वाटप केलयं, लाल बावटा आणि त्याचबरोबर पक्षाचे सगळे युवक वडिलधार्‍यांच्या आशिर्वादाने सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यायच काम शेकाप करेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

Exit mobile version