‘हे’ संघ सुपर चार साठी पात्र; भारत पाकिस्तान पुन्हा आमने सामने..

। कोलंबो । वृत्तसंस्था ।

आशिया चषकात आजपासून सुपर 4 फेरीच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले होते. त्यापैकी भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ सुपर 4 साठी पात्र ठरले आहेत. तर नेपाळ आणि अफगाणिस्तान हे संघ आशिया चषकातून बाहेर पडले आहेत. सुपर 4 मधील पहिला सामना आज बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे.

अफगणिस्तानचा तोंडचा घास हिरावला
सध्या आशिया चषक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत श्रीलंका विरुद्ध अफगणिस्तान हा सामना लाहोर या ठिकाणी खेळवला गेला. पहिल्यांदा फलंदाजी करत श्रीलंकेने अफगणिस्तानला २९२ धावांचे आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करण्यात अफगणिस्तानला अपयश आलं आणि अवघ्या दोन धावांनी अफगणिस्तानचा पराभव होवून अशिया चषक जिंकण्याचे स्वप्न संपुष्टात.
'हे' संघ सुपर-4 फेरीसाठी पात्र
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 'ग्रुप-ए' मधून सुपर चार राऊंडमध्ये दाखल झाले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्याकडे प्रत्येकी तीन गुण आहेत. या ग्रुपमधून नेपाळचा संघ बाहेर पडला आहे. दुसरीकडे श्रीलंका संघ 4 गुणांसह आणि बांगलादेश संघ दोन गुणांसह  'ग्रुप-बी' मधून सुपर चार राऊंडमध्ये पोहोचले आहेत. या ग्रुपमधून अफगाणिस्तानला सुपर चार राऊंडमध्ये पोहोचता आलं नाही. सुपर-4 स्टेजमध्ये एकूण 6 सामने खेळवले जातील. यानंतर गुणतालिकेतील टॉप दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे.
सुपर-4 चे सामने कधी आणि कुठे …

06 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, लाहोर
09 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, कोलंबो
10 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध भारत, कोलंबो
12 सप्टेंबर - भारत विरुद्ध श्रीलंका, कोलंबो
14 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, कोलंबो
15 सप्टेंबर - भारत विरुद्ध बांगलादेश, कोलंबो
17 सप्टेंबर - अंतिम सामना, कोलंबो.
Exit mobile version