| मुंबई | प्रतिनिधी |
यावर्षीच्या गणेशोत्सवात लालबागचा राजाही विराजमान होणार आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय झाला असून, कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करूनच यंदा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गत वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा विराजमान झाला नव्हता.
गणेश भक्तांच्या विनंतीवरून यावर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा गणेशोत्सव राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच साजरा केला जाईल, असेही मंडळाने जाहीर केले आहे. तसेच, गणेश मूर्तींच्या उंचीसंदर्भात सरकारने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे, यावेळी लालबागच्या राजाची मूर्ती केवळ चार फुटांचीच असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मंडळाच्या या निर्णयामुळे आता अनेक भक्तांना गणेशोत्सवात लालबागच्या राजाचे दर्शन घेता येणार आहे.