। पनवेल । वार्ताहर ।
दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्याने ठोंबरेवाडीमध्ये पुराची समस्या निर्माण होत असते. त्यात आणखी भर म्हणून वाधाव ग्रुप व्हाईस सिटी पनवेल यांनी पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने गावाला पुराचा धोका निर्माण हत आहे. घरात दोन ते तीन फूट पाणी साचुन सामानाची दुर्दशा होत आहे.
उपोषण कर्त्यांनी बोलताना सांगितले की, आम्हाला न्याय न मिळाल्यास हे उपोषण असेच सुरू ठेवणार. संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करावी व पाण्याचा मार्ग पूर्ववत करावा. या मागणीसाठी आम्ही आमरण उपोषणास बसलो असून या निवेदनाची प्रत तालुका पोलीस ठाणे, पनवेल तहसिलदार यांना देण्यात आली आहे. यावेळी राजेश लबडे, अनिल चव्हाण, ज्ञानेश्वर धोंडू बडे, प्रशांत सोनवणे, वसंत ठोंबरे, वामन ठोंबरे, बळीराम कातकरी, विकास ठोंबरे, चंद्रकांत सोनवले, जगदीश प्रभू यांनी उपोषणकर्त्याना भेट दिली.
ठोंबरेवाडी ग्रामस्थांचे उपोषण
