| लांजा | प्रतिनिधी |
तालुक्यातील गोळवशी खांबड वाडी येथील दिवेश यशवंत बिराडी (22) यांच्या घरातील कुटुंबीयांना मंगळवारी (दि.5) दुपारी साडेबाराच्या सुमारास आरोपी कल्पेश रांबाडे, प्रशांत रांबाडे आणि त्यांच्या चार साथीदार रा. कोंड्ये यांनी गोळवशी येथे बेदम मारहाण केली. दिवेश यशवंत बिराडी यांच्यामुळे संबंधित कुटुबियांशी सोयरीक जमवण्यात अडसर येत असल्याच्या भावनेतून बिराडी कुटुंबीयांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.
मारहाण झाल्याप्रकाराबद्दल लांजा पोलीस ठाण्यात दिवेश यशवंत बिराडी यांनी तक्रार दाखल केली आहे. परंतू, लांजा पोलिसांनी बिराडी यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा लेखी गुन्हा दाखल करण्यास पोलीसांना भाग पाडले. मात्र, मार्च महिना संपत आला तरी लांजा पोलिसांकडून गुन्हेगारांवर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत. असे प्रकार कोकणात सुरु झाले तर कोकणचा युपी, बिहार व्हायला वेळ लागणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. तसेच, आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी बिराडी कुटुंबिय करीत आहेत.