पूरग्रस्तांना मदत करणार्‍यांचा होणार सन्मान

छावा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
। महाड ।

छावा प्रतिष्ठानतर्फे महाड पोलादपूर मध्ये उद्भवलेल्या पूर्णपरिस्थितीमुळे आलेल्या महासंकटामध्ये संवेदनशील मनाने धावून गेलेल्या माणगाव तालुक्यातील सर्व मंडळाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम युवानेते निलेश थोरे व छावा प्रतिष्ठानच्या सहकार्यानी हाती घेतला आहे.

छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश थोरे यांनी सांगितले कि, महाड-पोलादपूरला जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही तालुक्यात भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी ह्या दोन्ही तालुक्याना केवळ रायगड जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण राज्य व परराज्यामधून देखील हस्ते मदतीचा ओघ सुरु होता, दोन्ही तालुक्यांना लगत असणार्‍या माणगांव तालुक्यातील शेकडो युवक मंडळ,ग्रामस्थ तसेच महिला मंडळ, अनेक संघटना व व्यक्तिशः देखील अनेकांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पूर व दरडग्रस्त जनतेला ताजे अन्न, किराणा साहित्य, औषधे, कपडे अशा विविध स्वरूपात पहिल्या दिवसापासून जाऊन मदत दिली.

या माणुसकीच्या नात्याने केलेल्या सहकार्याचा सन्मान कुणीतरी नक्कीच केला पाहिजे ह्या भावनेने आम्ही छावा प्रतिष्ठानच्या माध्यमातून माणगाव तालुक्यातील सर्व मंडळाचा यथोचित सत्कार थेट प्रत्येकाच्या गावांत जाऊन शनिवारी (दि.16) व रविवारी (दि.17) अश्या दोन दिवासीय तालुका दौर्‍यात करणार येणार आहे.

Exit mobile version