मनसेच्या मागणीविरुद्ध छावा संघटना अक्रमक
| महाड | प्रतिनिधी |
वहूर येथील दर्गा जमीनदोस्त करा, ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड यांच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे महाड प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, मनसेच्या या मागणीचा छावा मराठा योद्धा या संघटनेने तीव्र विरोध केला आहे.
छावा मराठा योद्धा संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष पराग वडके यांनी महाड पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, वहूर येथील दर्गा बहुजन समाजाचे श्रद्धास्थान असून, मनसे मतांचे राजकारण करून जातीय तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, छावा संघटना हे खपवून घेणार नसल्याचा सज्जड इशारा त्यांनी दिलेल्या आपल्या निवेदनात दिला आहे.