। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्यात पक्षी निरीक्षण करण्यासाठी गेलेल्या दोघा जणांना अज्ञात दोन व्यक्तींनी धारदार चाकू व छर्याच्या बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे.
अय्यप्पन हरिहरसुब्रमण्यम (45 रा.चेंबुर) व रविशंकर मंथा असे दोघे कर्नाळा अभयारण्यात पक्षी निरीक्षणासाठी गेले होते. यावेळी या दोघांकडे दोन अज्ञात व्यक्ती आले व त्यांनी त्यांच्याकडील धारदार चाकू तसेच छर्याच्या बंदुकीचा धाक दाखवून अय्यप्पन हरिहरसुब्रमण्यम यांच्या गळ्यातील जवळपास 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व अय्यप्पा स्वामींचे दोन ग्रॅमचे पेंडण असा सोन्याचा ऐवज काढून घेऊन त्यांना धमकावून ते पसार झाले आहेत. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.