टेलिग्राम ॲपद्वारे हजारोंची फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

कामोठेमधील एका तरुणाची 26 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याविषयी ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामोठे सेक्टर-30 मध्ये राहणारा गणेश हा तरुण एका बँकेमध्ये सेल्स एक्झिक्युटीव्ह पदावर काम करत आहे. त्याच्या मोबाइलवरील टेलिग्राम ॲपवर एक मेसेज आला. त्यामध्ये पार्टटाईम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. एका ग्रुपवर लिंक पाठवून लाईक व सबस्क्राईब करण्यास सांगितले. पहिले तीन टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यात 150 रुपये जमा करण्यात आले. यानंतर 500 रुपये, 1 हजार रुपये आणि 1700 रुपये अशी रक्कम भरण्यास सांगितली. त्याबदल्यात बीट कॉईन जमा झाल्याचे दाखविण्यात आले. एक आठवड्यात विविध टास्क सांगून 26 हजार रुपये हडप करण्यात आले.

Exit mobile version