। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोपरखैरणेतील एका व्यावसायिकाच्या क्रेडीट कार्डमधून परस्पर 65 हजारांची खरेदी करून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली येथील रहिवासी महम्मद नसीम महम्मद अमीन चौधरी (24) यांचे कोपरखैरणे सेक्टर-20 मध्ये चौधरी इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान आहे. 3 ऑक्टोबर रोजी चौधरी रात्री 12 च्या सुमारास घरी निघाले असता, त्यांच्या मोबाईलवर एचडीएफसी बँक खात्यातून 64,999 रुपये कट झाल्याचे व त्याची खरेदी अमेझॉन पवरून झाल्याचा मेसेज आला.
चौधरी यांनी तत्काळ कस्टमर केअरला फोन करून क्रेडीट कार्ड ब्लॉक केले. मात्र तोपर्यंत त्यांच्या क्रेडिट कार्डवरून 64,999 रुपयांची खरेदी करण्यात आली होती. त्यांनी याप्रकरणी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.