अलिबाग तालुक्यात 10 दिवसात हजार रुग्ण

165 नवे रुग्ण, 40 कोरोनामुक्त
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढतीच असली तरी 95 टक्के रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. गेल्या दहा दिवसात तालुक्यात 1 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी 165 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 10 जानेवारी रोजी तालुक्यातील संसर्गित रुग्णांची एकूण संख्या 21 हजार 115 झाली आहे. ती आता 22 हजार 115 वर गेली आहे. तर 40 जणांनी दिवसभरात कोरोनावर मात केली आहे. सुदैवाने आज एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. बुधवारी तालुक्यात आढळून आलेल्या 35 रुग्णांमध्य चेंढरे, अलिबाग शहर, पोयनाड, तुडाळ, झिराड, कोळगाव, मुशेत, रेवदंडा, कुरुळ, बोरीस, हाशिवरे, चौल, पेझारी, चोंढी, थळ, परहूरपाडा, डांगी, पेढांबे, सहाणगोठी, पोफेरी, वाडगाव, नागाव, आवास, किहीम, भाल, सहाण, नवगाव, धाकटे शहापूर, नवखार, पेझारी, तळवली, सुडकोळी, नवीन देहेन, बांधण, वाघोडे, भोनंग, थेरोंडा, तीनविरा, नवेदर बेली, मापगाव, वेश्‍वी, तळोजा मजकूर, सारळ, कोपर, शहाबाज, वरसोली या गावातील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 22 हजार 115 झाली आहे. 614 रुग्णांचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 20 हजार 430 जण कोरोनामुक्त झाले असून सद्यस्थितीत 614 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version