| मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आदेशानुसार 25 जानेवारी रोजी परीक्षा पे चर्चा या उपक्रमाअंतर्गत मुरुड तालुक्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत मोठा सहभाग नोंदवला होता. मुरुड शहरातील सर.एस.ए.हायस्कूलच्या भव्य पटांगणावर हजारो विद्यार्थी विविध विषयावर चित्र काढण्यासाठी जमले होते. या चित्रकला स्पर्धेसाठी बेटी बचाव बेटी पढाव, स्वछ भारत अभियन, आझादी का अमृत महोत्सव, कोरोना लसीकरणात भारत एक नंबर, चुलीच्या धुराच्या त्रासापासून मुक्त महिला मोदींचा निर्णय आदी विषयावर चित्र काढण्यास सांगण्यात आले होते. सर्व शालेय विद्यार्थी आपापली चित्रे काढण्यात रममाण झाली होती.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक याना रोख रक्कम व सन्मानचिन्ह तहसीलदार रोहन शिंदे, निवडणूक नायब तहसीलदार अमित पुरी, गट विकास अधिकारी संगीत भांगरे गट शिक्षण अधिकारी बाबुलाल पाखरे, प्रशासन अधिकारी दीपाली दिवेकर यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले.तसेच 25 उत्तेजनार्थ बक्षीस सुद्धा देण्यात आली.
चित्रकला स्पर्धा गट शिक्षण अधिकारी बाबुलाल पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या. चित्रकला स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर.एस.ए.हायस्कूल मुख्याध्यापक सरोज राणे, जाहिद गोठेकर, महेंद्र पाटील, लियाकत धनसे,बी.एस.मोरे, संतोष पुकळे तसेच उच माध्यमिकचे सर्व शिक्षक आदी मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले.