| पनवेल | प्रतिनिधी |
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कामोठे परिसरातील कार्यकर्ते ऋषिकेश कांबळे यांना फोनवरून अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटला घडली. याबाब कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या शुभेच्छांच्या बॅनरबाबत विचारणा करताना संबंधित व्यक्तीने फोनवरून ऋषिकेश कांबळे यांना आक्षेपार्ह व जातीवाचक भाषा वापरल्याचा तसेच धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे कामोठे परिसरातील शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक निकम, महानगरप्रमुख ॲड. समाधान काशीद, सुनील गोवारी, गोपीनाथ भगत, सचिन गायकवाड, सूर्या सुपेकर, प्रभाकर गोवारी, विजय गोवारी, गणेश खांडगे, मनोज जाधव, अक्षय ननावरे, संतोष पडळकर, संतोष गोळे, महेश भिसे, संतोष सावंत, जयेश गोवारी यांच्यासह कामोठे परिसरातील प्रभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऋषिकेश कांबळे यांना धमकी
