| मुंबई | वृत्तसंस्था |
भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी सणासुदीच्या दिवसात दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. महत्त्वाची ठिकाणे, शासकीय कार्यालये, पर्यटनस्थळे अशा ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या ठिकाणी कडक तपासणी करण्यात येत आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशन, मॉल्स आणि सार्वजनिक ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सुरक्षा रक्षकांनी या ठिकाणांवरील तपासणी सुरू केली आहे. सुरक्षेला यंत्रणेला अधिक सक्षम बनवण्यासाठी अनेक सुरक्षा एजन्सींकडून मुंबई शहराच्या सुरक्षेवर लक्ष ठेवले जात आहे.