। मुंबई । प्रतिनिधी ।
रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना सोमवारी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.
रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या फोन नंबरवर एका व्यक्तीने 8 वेळा धमकी देणारा फोन केला होता. या व्यक्तीने अंबानी कुटुंबाला 3 तासात संपवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने या याची माहिती डीबी मार्ग पोलिसांनी दिली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दहिसर येथून एका व्यक्तीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या एकूण बोलण्यावरून तो मनोरुग्ण असल्याचे वाटत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी एनआयए देखील चौकशी करणार असल्याचे समजते.