| नागपूर | वृत्तसंस्था |
नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देऊ अशा धमकीचा मेल सोमवारी (दि.29) एप्रिल विमानतळ प्रशासनाला आला आहे. या धमकीच्या मेलनंतर नागपूर विमानतळ परिसरात पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या माध्यमातून विमानतळावर तपासणी करण्यात आली. परंतु, तपासणीमध्ये नागपूर विमानतळावर कुठलीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल दिसून आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.