| अहमदनगर | प्रतिनिधी |
जगप्रसिद्ध आणि कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मंदिर उडवून देण्याची धमकी देणारा मेल साईबाबा संस्थानला प्राप्त झाला. धमकीचा हा मेल संस्थानच्या अधिकृत मेल अकाऊंटवर आला आहे. हा मेल मिळताच साईबाबा संस्थानची सुरक्षा यंत्रणा तसेच पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. हा मेल मिळताच संस्थानच्या सुरक्षा अधिकार्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा मेल नेमका कोणी केला? याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.