। कर्जत । प्रतिनिधी ।
मागील भांडणाचा राग मनात धरून महिलेला अश्लिल शिव्या देवून कुटूंबियांना जाळून मारण्याची धमकी देणार्या विरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत आरोपी रा.भिसेगाव रोड पारशी चाळच्या शेजारी कर्जत याने मागील भांडणाचा राग मनात धरून रात्रीच्या वेळी लाईट नसल्याचा फायदा घेवुन महिला फिर्यादी रा.भिसेगाव रोड पारशी चाळच्या शेजारी कर्जत यांचे घरात शिरुन फिर्यादी यांना धक्काबुक्की करुन त्यांना अश्लिल शिव्या देवुन फिर्यादी यांचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन फिर्यादी व त्यांचे कुटुंबियांना जाळुन मारण्याची धमकी दिली. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.282/2021 भा.दं.वि.क.354, 452, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीता आथणे करीत आहेत.