। दुबई । वृत्तसंस्था ।
भारतीय संघाच्या या खराब कामगिरीवर अनेक माजी खेळाडू टीका करत आहेत. भारतीय खेळाडू आयपीएलनंतर वर्ल्डकप खेळण्यास आले. तेव्हा असे वाटत होते की भारताची तयारी चांगली होईल. पण पुन्हा एकदा सिद्द झाले की आयपीएलचा अनुभव वर्ल्डकपमध्ये फार उपयोगी पडत नाही.त्यामुळे बीसीसीआयने संघ निवडताना त्याकडे दुर्लक्ष केले आणि भारताचा पराभव झाला.
भारतीय संघाने वर्ल्डकपआधी एक वर्षात फक्त 12 टी-20 सामने खेळले होते. यातील 3 सामने श्रीलंकेविरुद्ध होते ज्यात विराट कोहली, रोहित शर्मा सारखे स्टार खेळाडू नव्हते. या उटल पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपमध्ये शानदार कामगिरी करत आहे. त्यांनी गेल्या वर्षभरात 26 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले. अन्य संघांबाबत बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेने 24, न्यूजीलंड आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी 21, इंग्लंसडने 17 सामने खेळले.
आयपीएलच्या 2021ची अखेरची फेरी म्हणजे प्लेऑफच्या लढती 10 ऑक्टोबरपासून सुरू झाल्या. म्हणजे वर्ल्डकप सुरू होण्याच्या एक आठवडा आधी. या प्ले ऑफमध्ये भारताच्या वर्ल्डकप संघातील 6 महत्त्वाचे खेळाडू होते. यात विराट कोहली, रविंद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, ऋषभ पंत, वरुण चक्रवर्ती आणि रविचंद्रन अश्विन यांचा समावेश होता. 8 ऑक्टोबर रोजी मुंबई इंडियन्सने अखेरचा सामना खेळला होता. त्यात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराहसह भारतीय संघातील 6 खेळाडू होते. म्हणजे वर्ल्डकप सुरू होणार होता आणि जवळ जवळ संपूर्ण भारतीय संघ आयपीएलमध्ये ताकद पणाला लावत होता.
सर्वांना वाटत होते की आयपीएलचा फायदा वर्ल्डकपमध्ये होईल. पण असे काहीच झाले नाही. भारतीय संघात गरजेपेक्षा अधिक आत्मविश्वास दिसत होता आणि तेथेच मोठा घात झाला. बीसीसीआयसह सर्वांना वाटले की आयपीएलमधील मेहनतीमुळे भारत विश्वविजेता होईल. या उटल पाकिस्तान संघाने आंतरराष्ट्रीय सामन्यांवर अधिक फोकस केला. त्याचा परिणान सर्वांना दिसतोय.