प्रजासत्ताक दिनी मोदींवर धोक्याचे सावट

सुरक्षा यंत्रणांना दिला ‘हायअलर्ट’
। मुंबई । वृत्तसंस्था ।

सुरक्षा यंत्रणांच्या गोपनीय अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दहशहतवाद्यांच्या संभाव्य कटाबद्दल गुप्तचर यंत्रणांना सुगावा लागला आहे. नऊ पानांच्या गोपनीय अहवालातून ही बाब समोर आली आहे. इंडीया टुडेने याबद्दलचे वृत्त दिले आहे. त्यामुळे आता देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताकदिनी सुरक्षा यंत्रणांसमोर मोठं आव्हान असणार.
भारताच्या प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाला आशियायी देशांतील मोठ्या नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यामध्ये कजाकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या राष्ट्रांच्या मान्यवरांचा समावेश असणार असल्याची शक्यता आहे. या अहवालात असंही सांगण्यात आलं आहे की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या क्षेत्राबाहेरील गटांकडून हा कट रचला जाऊ शकतो. या गटांचं उद्दिष्ट मोठ्या पदावरील मान्यवरांना लक्ष्य करणं आणि सार्वजनिक मेळावे, महत्त्वपूर्ण आस्थापने आणि गर्दीच्या ठिकाणी दहशत निर्माण करणे हा आहे.

Exit mobile version