| पनवेल | प्रतिनिधी |
कळंबोली येथील इन्फ्युजन सेरेमनीज हॉलजवळ एका कंपनीच्या ॲल्युमिनियम प्लेट चोरीप्रकरणी कळंबोली पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सिव्हिल सुपरवायझर भूपेंद्र ललामदास पांडे यांच्या म्हणण्यानुसार, सिंगलस्टार ॲड कन्सर्ट प्रा.लि.च्या कळंबोली येथील इन्फ्युजन सेरेमनीज पार्किंग क्रमांक 1 जवळून ॲल्युमिनियम प्लेट चोरीला गेल्या होत्या. या तपासात कुशी धरम सांकी (19), राजेश अभय पवार (21) आणि प्रेम अभय पवार (20) यांना अटक करण्यात आली. हे तिघेही नातेवाईक आहेत. त्यांचे मूळ घर उत्तर प्रदेशात असून, सध्या नवीन पनवेल परिसरात वास्तव्यास आहेत. दरम्यान, चोरी गेलेल्या 31 हजार रुपये किमतीच्या 14 ॲल्युमिनियम प्लेट त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.






